इयत्ता ८ वी · मराठी

१. आम्ही चालवू हा पुढे वारसा (गीत)

जगदीश खेबूडकर — कवितेचा भावार्थ व स्वाध्याय. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).

Advertisement

कवितेचा आशय : गुरूच्या शिकवणीतून सद्गुण अंगी बाणवून सत्कार्ये करणे, म्हणजेच गुरूने दिलेला वारसा पुढे चालू ठेवणे होय. हा ज्ञानाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन प्रस्तुत गीतातून कवी जगदीश खेबूडकर देत आहेत.

कवी परिचय

जगदीश खेबूडकर (१९३२-२०११) — प्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक व गीतकार. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली असून, ‘गदिमा पुरस्कार’, ‘साहित्य सम्राट पुरस्कार’, ‘व्ही. शांताराम स्मृति पुरस्कार’, ‘जीवनगौरव पुरस्कार’ अशा ६० हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

कवितेचा भावार्थ

१गुरुने दिला ज्ञानरूपी वसा...

कवी म्हणतात — आमच्या गुरूंनी आम्हाला जे ज्ञानरूपी व्रत (वसा) दिले आहे, तो ज्ञानाचा आणि परंपरेचा वारसा आम्ही असाच पुढे चालवू.

२पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली...

हे गुरुदेव! तुम्हीच आमचे वडील, भाऊ, मित्र आणि आई (माउली) आहात. तुम्ही कल्पवृक्षाच्या शीतल सावलीसारखे आहात, ज्याच्या आश्रयाला सर्व सुखे मिळतात. तुम्हीच आम्हाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी सूर्यासारखा प्रकाश (कवडसा) दिलात.

३जिथे काल अंकुर बीजातले...

काल जिथे मातीत पेरलेल्या बीजामध्ये फक्त अंकुर होते, तिथे आज वेलीवर सुंदर फुले फुलली आहेत. तुमच्या शिकवणीतून हा आमचा ज्ञानाचा वृक्ष असाच फळांनी बहरून जावा (फलद्रुप व्हावा) अशी आमची इच्छा आहे.

४शिकू धीरता, शूरता, वीरता...

तुमच्या आदर्शातून आम्ही संयम (धीरता), शौर्य आणि वीरता शिकू. विद्येसोबतच आमच्या अंगी नम्रता धारण करू. आमच्या मनात नेहमी हाच एक ध्यास असेल की आम्ही सद्वर्तनी व ज्ञानी बनू.

Advertisement

५जरी दुष्ट कोणी करू शासन...

जर कोणी दुष्ट असेल तर त्याला आम्ही योग्य ती शिक्षा (शासन) करू. मात्र गुणी आणि सज्जन माणसांचे नेहमी रक्षण व पालन करू. आमच्या मनावर तुमच्या या शिकवणीचा कायमचा ठसा उमटलेला आहे.

६तुझी त्याग-सेवा फळा ये अशी...

हे पुण्यवान भल्या माणसा (गुरुदेव)! तुझा त्याग आणि तुझी जनसेवा अशी फळाला येऊ दे की तुझ्या सत्कार्यांची कीर्ती दाही दिशांना पसरेल आणि तुझा ज्ञानाचा वारसा आम्ही असाच पुढे चालवत राहू.

स्वाध्याय