इयत्ता ५ वी · मराठी

२०. गमतीदार पत्र

पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, प्रश्नांची उत्तरे आणि व्याकरण (विरामचिन्हे) — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).

Advertisement

१एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) पत्र कोणी पाठवले ?
पत्र काकांनी पाठवले.

(आ) पत्र कोणाला पाठवले ?
पत्र मायाला पाठवले.

(इ) मायाला पत्र का वाचता आले नाही ?
काकांनी पाठवलेल्या पत्रावर काहीच लिहिलेले नव्हते, तो कागद कोरा होता, म्हणून मायाला पत्र वाचता आले नाही.

२कोण ते सांगा.
  • (अ) कोरे पत्र पाहून आश्चर्य वाटणारी — माया
  • (आ) कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असणारी — रेश्मा

Advertisement

३खालील शब्द असेच लिहा.

पत्र, मित्र, सत्र, रात्र, त्रयस्थ, पात्र, त्राण, वात्रट, कंत्राट.

४खालील वाक्यांत पूर्णविराम (.), प्रश्नचिन्ह (?) व स्वल्पविराम (,) घाला.

(१) मी संगणक सुरू केला मामाचा ई-मेल वाचला मामा चार दिवसांनी येणार होता आम्ही आनंदित झालो
उत्तर: मी संगणक सुरू केला. मामाचा ई-मेल वाचला. मामा चार दिवसांनी येणार होता. आम्ही आनंदित झालो.

(२) रमेश सीता अनिता गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात
उत्तर: रमेश, सीता, अनिता, गणेश हे सर्वजण दररोज बागेत खेळतात.

(३) तू जेवण केलेस का
उत्तर: तू जेवण केलेस का?

(४) हे ऐकून तुला आनंद झाला का
उत्तर: हे ऐकून तुला आनंद झाला का?

(५) मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो
उत्तर: मी, आई, बाबा, राजू, पिंकी बाजारात गेलो.

(६) सुशांत रघू राजेश हे चांगले मित्र आहेत
उत्तर: सुशांत, रघू, राजेश हे चांगले मित्र आहेत.

५वाचा व लिहा.

आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुळस, दुर्वा, गवतीचहा, आले, लिंबू अशी अनेक औषधी झाडे असतात. झाडासारखा मित्र नाही. झाडे सावली देतात, फुले-फळे देतात, औषधे देतात. अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्या जवळच असतात. आपण त्यांची माहिती जाणून घेतली पाहिजे.