२३. प्रामाणिक इस्त्रीवाला
पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, प्रश्नांची उत्तरे आणि व्याकरण (लिंग, नाम, क्रियापद) — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).
शेअर कराAdvertisement
- (अ) पाचवीत शिकणारी — शिवानी
- (आ) कपड्यांच्या घड्या करणारा — भाऊ (शिवराज)
- (इ) आईजवळ पैसे देणारे — बाबा
- (ई) पैसे परत करणारे — दामूकाका (इस्त्रीवाले)
- (उ) पैसे मोजून घेणारी — आई
- (ऊ) दामूकाकांना बक्षीस देऊ करणारे — बाबा
(अ) "त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
असे आई शिवानीला म्हणाली.
(आ) "काय रे बाबा ? कपडे आणलेस का?"
असे आई दामूकाकांना (इस्त्रीवाल्यांना) म्हणाली.
(इ) "तुझा प्रामाणिकपणा मला आवडला."
असे बाबा दामूकाकांना म्हणाले.
(ई) "आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो."
असे दामूकाका बाबांना म्हणाले.
Advertisement
- इस्त्री + वाले = इस्त्रीवाले
- रिक्षा + वाले = रिक्षावाले
- भाजी + वाले = भाजीवाले
- फळ + वाले = फळवाले
- झाडू + वाले = झाडूवाले
स्वयंपाकघर, इस्त्रीवाला, कावरीबावरी, प्रामाणिक, संध्याकाळ.
विद्यार्थ्यांनी वरील शब्द जसेच्या तसे बघून शुद्ध स्वरूपात वहीत लिहून काढावेत आणि वाचनाचा सराव करावा.
| वाक्ये | क्रिया | क्रिया करणारी व्यक्ती / प्राणी | ||
|---|---|---|---|---|
| पुरुष | स्त्री | इतर | ||
| शिवानी पाचवीत शिकते. | शिकते | ✓ | ||
| आईने पैसे मोजले. | मोजले | ✓ | ||
| भाऊने कपड्यांच्या घड्या केल्या. | केल्या | ✓ | ||
| बाबांनी आईला पैसे दिले. | दिले | ✓ | ||
| दामूकाकांनी खिशातून पैसे काढले. | काढले | ✓ | ||
| पिलू घरट्यात बसले. | बसले | ✓ | ||
शिक्षकांसाठी टीप : भाऊ, बाबा, दामू ही पुल्लिंगी नामे आहेत. शिवानी, आई ही स्त्रीलिंगी नामे आहेत. 'पिलू' हे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी नाही. अशा नामाला नपुंसकलिंगी नाम म्हणतात. नामाला 'तो, ती, ते' शब्द लावून लिंग ओळखता येते.
| वाक्य | नाम | लिंग |
|---|---|---|
| (अ) कावळा झाडावर राहतो. | कावळा | पुल्लिंग (तो कावळा) |
| (आ) रेश्माने पत्र वाचले. | रेश्मा पत्र | स्त्रीलिंग (ती रेश्मा) नपुंसकलिंग (ते पत्र) |
| (इ) पोस्टमनने पत्र दिले. | पोस्टमन पत्र | पुल्लिंग (तो पोस्टमन) नपुंसकलिंग (ते पत्र) |
| (ई) मायाने पाकीट उघडले. | माया पाकीट | स्त्रीलिंग (ती माया) नपुंसकलिंग (ते पाकीट) |
| (उ) मायाने दार उघडले. | माया दार | स्त्रीलिंग (ती माया) नपुंसकलिंग (ते दार) |
| योग्य नाम भरलेले वाक्य | वाक्यातील क्रियापद |
|---|---|
| (१) ससा गवत खातो. | खातो |
| (२) मुलगी पत्र लिहिते. | लिहिते |
| (३) मुलगा पुस्तक वाचतो. | वाचतो |
| (४) गाय गवत खाते. | खाते |
| (५) ते फूल सुंदर आहे. | आहे |
| (६) ते घर मोठे आहे. | आहे |
- (अ) सुधीर गोष्ट सांगतो / वाचतो.
- (आ) ते झाड उंच आहे.
- (इ) रोझी गाणे गाते.
- (ई) ती वेल हिरवीगार आहे / दिसते.
चौकटींत काही अक्षरे दिली आहेत. त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
दिलेली अक्षरे: झा ड वि मा न / डू बा ळी क ळ / पं स म ड के / खा री क णी स / क ळ प तं ग / पा न दी गा य / ट र बू ज ऊ / ह वा ध र स
तयार झालेले अर्थपूर्ण शब्द:
झाडू, विमान, माकड, बाळ, कळी, खारीक, कणीस, पतंग, पान, नदी, गाय, टरबूज, हवा इत्यादी.