इयत्ता ५ वी · मराठी

२७. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

लेखक — डॉ. भि. ना. दहातोंडे | पाठाचा संपूर्ण स्वाध्याय, प्रश्नांची उत्तरे आणि विरुद्धार्थी शब्द — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).

Advertisement

१एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) विठ्ठलचा जन्म कोठे झाला ?
विठ्ठलचा जन्म जमखंडी गावी झाला.

(आ) विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे ?
लहानगा विठ्ठल हुतुतू, खो-खो, सुरपारंब्या यांसारखे खेळ खेळत असे.

(इ) विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली ?
दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता, तेव्हा विठ्ठलच्या आजोबांनी गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटून मदत केली.

(ई) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाजसुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन आयुष्यभर कार्य केले.

२योग्य पर्यायापुढे '✓' अशी खूण करा.

(१) गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण...

  • (अ) तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे.
  • (आ) तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे. ✓

(२) जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा .....

  • (अ) विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले. ✓
  • (आ) भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले.

Advertisement

३खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
  • (अ) जन्म × मृत्यू
  • (आ) आवड × नावड
४कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
  • (अ) डोंगर पर्वतापेक्षा लहान आहे. (मोठा)
  • (आ) हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला. (दुःख)
  • (इ) ससा हा प्राणी भित्रा असतो. (धीट)
  • (ई) राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत. (सैल)
  • (उ) वीणा हळूहळू चालते. (भरभर)
५खालील शब्द वाचा व असेच लिहा.

विठ्ठल, अण्णासाहेब, हुतुतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर, हृदय.

६तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.

होय, आमच्या परिसरात एक दानशूर व्यक्ती राहते. ते नेहमी गरजू लोकांना मदत करतात. कोरोनाच्या काळात जेव्हा अनेकांचे रोजगार गेले होते, तेव्हा त्यांनी गरिबांना धान्य आणि आवश्यक औषधे वाटली होती. तसेच, महापुराच्या वेळी त्यांनी पूरग्रस्तांना कपडे आणि जेवणाची पाकिटे वाटून मोठी मदत केली होती. ते दरवर्षी शाळेतील गरीब मुलांना पुस्तके आणि वह्या वाटतात.

★खाली दिलेले वाक्य वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.

लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती