इयत्ता ५ वी · मराठी

६. ऐकूया. खेळूया.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) इयत्ता ५ वी मराठी पाठ ६ — पाठातील मैदानी खेळांच्या कृती व माहिती.

Advertisement

टीप : हा एक कृतीयुक्त पाठ आहे. यामध्ये कोणताही लेखी स्वाध्याय दिलेला नाही. विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम व्हावा आणि त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षकांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी मैदानावर या शारीरिक कृती करायच्या आहेत.

★पाठातील शारीरिक कृती (खेळ)

चित्रे पाहून खालील कृती मैदानावर करा :

१. शाळेच्या मैदानावर पन्नास मीटर धावा.
२. बेडकाप्रमाणे दहा उड्या मारत जा.
३. शंकूवरून उड्या मारत जा.
४. हत्तीसारखे तीन मीटर चाला.
५. एका जागी पाच उंच उड्या मारा.
६. चार कोलांट्या उड्या मारा.
७. जमिनीवरील शिडीच्या चौकोनांतून धावा.
८. दोरीवरच्या वीस उड्या मारा.

Advertisement