इयत्ता ५ वी · मराठी

५. डराव डराव ! (कविता)

कवी — ग. ह. पाटील | महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) इयत्ता ५ वी मराठी पाठ ५ — संपूर्ण स्वाध्याय व प्रश्नांची उत्तरे.

Advertisement

★शब्दार्थ
शब्दअर्थ
तुडुंब भरणेकाठोकाठ भरणे
जाहलीझाली
आणिकआणि
बटबटीतमोठाले, विद्रूप
ध्यानविशिष्ट रूप
गाठणेपोहचणे
अपुलाआपला, स्वतःचा

स्वाध्याय

प्र. १एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) 'डराव डराव' आवाज कोण करतो ?
'डराव डराव' आवाज बेडूक करतो.

(आ) तलाव का भरला ?
धो-धो पाऊस पडल्यामुळे तलाव काठोकाठ (तुडुंब) भरला.

(इ) बेडकाचे डोळे कसे आहेत ?
बेडकाचे डोळे मोठे आणि बटबटीत आहेत.

प्र. २जोड्या जुळवा.
'अ' गट'ब' गट
(१) जोराचा पाऊस(आ) धो-धो पाऊस
(२) बेडकाचे मोठे डोळे(इ) बटबटीत डोळे
(३) पूर्ण भरलेला तलाव(ई) तुडुंब भरला तलाव
(४) स्वतःच्या गावी परत जा(अ) गाठा अपुला गाव

Advertisement

प्र. ३गोलातील शब्द वाचा. चित्रे ओळखा. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
चित्र / वस्तूआवाजाचा शब्द
बांगड्याकिङ्किण्
वीजकड्कड्
घंटाघण्घण्
घुंगरू / पैंजणछुम्छुम्
पाण्याचा झराखळ्खळ्
नाणीछन्छन्
ढोलढम्ढम्
प्र. ४पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात ?

पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी, नाव, बोट, जहाज, लाँच, आणि पाणबुडी यांसारखी साधने वापरतात.

प्र. ५पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता ?

पावसात भिजू नये, यासाठी आम्ही छत्री, रेनकोट आणि पावसाळी बूट (गमबूट) वापरतो.

प्र. ६निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.

(अ) वाऱ्याने हालणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज.
सळसळ

(आ) उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज.
फडफड

(इ) तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज.
तडतड

प्र. ७छत्रीचे चित्र काढा. रंगवा.
★वाचा. लक्षात ठेवा.

'नाव' हा शब्द या कवितेत दोन अर्थांनी आला आहे.

  1. नाव — वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव. (उदा. "सांगा नाव")
  2. नाव — होडी. (उदा. "सुरू जाहली अमुची नाव")