इयत्ता ५ वी · मराठी

८. कोणापासून काय घ्यावे? (कविता)

कवयित्री — नीलम माणगावे | महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) इयत्ता ५ वी मराठी पाठ ८ — संपूर्ण स्वाध्याय व प्रश्नांची उत्तरे.

Advertisement

★कवितेचा भावार्थ

कवयित्री नीलम माणगावे यांनी निसर्गातील विविध घटकांकडून आपण कोणते चांगले गुण घ्यावेत, हे या कवितेत अतिशय सुंदर शब्दांत सांगितले आहे.

आपण सूर्याकडून नवनिर्मितीचा रंग घेऊया आणि चंद्राकडून शांती घेऊया. आकाशात चमचमणाऱ्या ताऱ्यांकडून आपण दिव्य तेज घेऊया.
फुलांकडून सुगंध घ्यावा आणि कोकिळेकडून गोड गाणे घ्यावे. झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याकडून आपण नवीन गाणे (तराणे) घ्यावे.
झाडाकडून इतरांना सावली देण्याची वृत्ती घ्यावी आणि मातीकडून इतरांसाठी जगण्याची वृत्ती घ्यावी. आकाशात गडगडणाऱ्या ढगांकडून आपण जीवनगाणे घेऊया.
पहाटेच्या वेळी आपण एकच गोष्ट शिकूया ती म्हणजे स्वतः जगत असताना इतरांनाही आनंदाने जगवूया. आणि संध्याकाळच्या वेळी आपण सर्व मित्रांनी एकत्र येऊन हसतखेळत आनंद लुटूया.
★शब्दार्थ
शब्दअर्थ
कांतीतेज
प्रभातकाळपहाट, सूर्योदयाचा काळ
संध्यासमयीसंध्याकाळी

स्वाध्याय

प्र. १रिकाम्या जागा भरा.

(अ) झाडापासुन घेउ सावली.

(आ) मातीपासुन जगणे.

(इ) प्रभातकाळी एक शिकूया.

(ई) जगवित जीव जगूया.

Advertisement

प्र. २कवितेतील कोणाकडून काय घेता येईल ते लिहा.
कोणाकडूनकाय घेता येईल
(अ) सूर्यरंग
(आ) चंद्रशांती
(इ) तारादिव्य कांती (तेज)
(ई) फूलगंध (सुगंध)
(उ) कोकीळगाणे
(ऊ) झरानवे तराणे
(ए) झाडसावली
(ऐ) मातीजगणे
प्र. ३कवितेत 'चमचम' शब्द आलेला आहे. यासारखे शब्द माहीत करून घ्या व लिहा.

'चमचम' यांसारखे नादमय शब्द खालीलप्रमाणे आहेत :

झुमझुम रुणझुण गुणगुण खळखळ सळसळ धडधड रिमझिम भिरभिर टपटप फडफड