इयत्ता ५ वी · मराठी

९. सिंह आणि बेडूक (चित्रकथा)

लेखक — मुकुंद तळवलकर | संपूर्ण स्वाध्याय, कथेतील गाळलेले शब्द व प्राण्यांचे आवाज — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).

Advertisement

★चित्रांच्या जागी योग्य शब्द वापरून पूर्ण केलेली कथा :

एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, "कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. आता मीही मोठा आवाज काढतो."

बेडकाने मोठा आवाज काढला. सिंहाला हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले, 'कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे.' सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला.

सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले.

टीप : पाठ्यपुस्तकात दिलेल्या चित्रांच्या जागी चौकटीतील योग्य शब्द भरून ही कथा पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांनी ही कथा वहीत लिहून काढावी.

स्वाध्याय

प्र. १या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगा व लिहा.

या गोष्टीत प्रामुख्याने सिंह आणि बेडूक या प्राण्यांची नावे आली आहेत.

प्र. २सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण, ते सांगा.

सिंह व बेडूक यांमध्ये सिंह हुशार आहे.

कारण : जेव्हा बेडकाने मोठा आवाज काढला, तेव्हा सिंहाने घाई न करता आधी आवाज ऐकून परिस्थितीचा अंदाज घेतला, सावधगिरी बाळगली आणि नंतर योग्य ती कृती केली. याउलट, बेडकाने स्वतःच्या ताकदीचा विचार न करता उगाचच मोठ्या सिंहाला आव्हान दिले.

प्र. ३गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहीत करून घ्या. आवाज काढून दाखवा.

Advertisement

खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते वाचा.

प्राणीत्यांचा आवाज (ओरडणे)
(अ) वाघडरकाळी
(आ) हत्तीचीत्कार
(इ) गायहंबरणे
(ई) बकरीबें-बें
(उ) घोडाखिंकाळणे
(ऊ) कुत्राभुंकणे

चित्रसंदेश — ऐका. वाचा.

नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी.
झाडे लावा, झाडे जगवा. प्रदूषण टाळा, जग वाचवा.
नको दंड, नको शिक्षा. स्वच्छ गाव हीच अपेक्षा.
जपून वापर पाण्याचा. आधार असे हा जगण्याचा.

वाचा व लक्षात ठेवा : पहिल्या संदेशात 'पाटी' हा शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांनी आला आहे :

  • १. पाटी — टोपली (डोक्यावर ओझे वाहण्यासाठी वापरली जाणारी)
  • २. पाटी — ज्यावर लिहिले जाते ती (शिक्षणासाठी वापरली जाणारी पाटी)

संदेश : मुलामुलींच्या डोक्यावर ओझ्याची पाटी (टोपली) देऊ नका, तर त्यांच्या हातात शिक्षणाची पाटी द्या, म्हणजेच मुलामुलींना शिकवा.