इयत्ता ८ वी · मराठी

४. आपण सारे एक

प्रभा बैकर — संपूर्ण स्वाध्याय, प्रश्नांची उत्तरे आणि व्याकरण. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).

Advertisement

लेखिका परिचय : प्रभा बैकर (१९४८) — प्रसिद्ध लेखिका. शरीररूपी राज्यातील सर्वच इंद्रिये परस्परांना पूरक व महत्त्वाची असतात. सर्वांनी एकोप्याने राहून परस्परांची काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहते, हे या नाटिकेतून सहज सोप्या शब्दांतून लेखिकेने पटवून दिले आहे.

स्वाध्याय

१एका शब्दांत उत्तरे लिहा.
  • (अ) माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे — नयनकुमार (डोळे)
  • (आ) माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी — कर्णिका (कान)
  • (इ) वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी — नासिका (नाक)
  • (ई) जिव्हाताईने ज्यांना संपात सामील करून घेतले ते — दंतराज (दात)
  • (उ) सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते — मेंदूराजे
  • (ऊ) अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते — पोटोबा
२आकृती पूर्ण करा.

(अ) जिव्हाताईची कामे :

  • १. गोड बोलणे.
  • २. नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव चाखणे.

(आ) पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय :

  • पदकुमार : मी स्वयंपाकघरापर्यंत जाणार नाही.
  • हस्तकराज : मी घास उचलणार नाही.

(इ) जिव्हाताईची तक्रार :

  • पोटोबा खवय्ये काहीच काम करत नाहीत. ते नुसते आयते बसून खातात.
  • त्यांच्यामुळेच सर्वांची फरफट होते आणि सगळा मान-सन्मान पोटोबालाच मिळतो.

Advertisement

३कारणे शोधा व लिहा.

(अ) जिव्हाताई गप्प आहे, कारण...
तिला पोटोबा खवय्येची मोठी चीड यायला लागली होती.

(आ) पोटोबा अधूनमधून गुरगुरतो, कारण...
ती त्याची सवय आहे.

४स्वमत स्पष्ट करा.

(अ) 'आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत' या विधानाबाबत तुमचे मत.

आपले शरीर हे एका राज्यासारखे आहे. ज्याप्रमाणे राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सर्व मंत्र्यांनी आणि सेवकांनी एकजुटीने काम करणे आवश्यक असते, तसेच शरीराचेही आहे. डोळे, नाक, कान, जीभ, हात, पाय आणि पोट हे सर्व शरीराचे सेवक आहेत. कोणत्याही एका अवयवाने काम करणे थांबवले तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. पोटोबाने अन्न ग्रहण केले नाही, तर शरीराला जीवनरस मिळत नाही आणि सर्व अवयव गळून जातात. म्हणून, सर्वांची कामे एकमेकांवर अवलंबून आहेत व आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत हे मेंदूराजेसाहेबांचे विधान अगदी योग्य आहे.

(आ) पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.

सर्व इंद्रियांनी पोटोबाविरुद्ध अशी तक्रार केली की, पोटोबा अजिबात काम करत नाही आणि नुसता आयते बसून खातो. डोळे, नाक, कान, जीभ, हात व पाय हे सर्व रात्रंदिवस शरीरासाठी राबराब राबतात, मात्र 'कशासाठी? पोटासाठी!' असे म्हणून सर्वजण पोटोबाचाच उदोउदो करतात. मान-सन्मान सगळा पोटोबालाच मिळतो, तो आपल्यावर सक्ती करतो आणि वेळप्रसंगी गुरगुरतो. पोटोबाच्या या वागणुकीमुळे आपली फरफट होते, या रागातूनच सर्व इंद्रियांनी पोटोबाची तक्रार मेंदूराजेंकडे केली.

खेळूया शब्दांशी

अखालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घाला.
  • (अ) तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर
    उत्तर : "तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर!"
  • (आ) हो हो आमची तयारी आहे
    उत्तर : "हो, हो, आमची तयारी आहे."
आवर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा : (भरभर, सावकाश, पोटोबाविरुद्ध, बापरे, आणि, सतत, किंवा, कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल, अथवा, अबब)
क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय
भरभर, सावकाश, सतत, कशासाठी पोटोबाविरुद्ध, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल आणि, किंवा, अथवा बापरे, अबब
इखालील शब्दांसाठी पाठात वापरलेले शब्द लिहा.
  • (अ) कान — कर्णिका
  • (आ) नाक — नासिका
  • (इ) हात — हस्तकराज
  • (ई) पाय — पदकुमार
  • (उ) जीभ — जिव्हाताई
★उपक्रम