९. झुळूक (कविता)
कवी — दामोदर कारे | संपूर्ण स्वाध्याय, संवादलेखन आणि व्याकरण — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).
शेअर कराAdvertisement
दामोदर कारे (१९०९-१९८५) : प्रसिद्ध कवी. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. 'निसर्ग' हा त्यांच्या कवितांचा आवडता विषय आहे. त्यांचा 'नन्दादीप' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. आपण वाऱ्याची झुळूक झालो तर कोठे कोठे जाता येईल, काय काय पाहता येईल आणि कोणकोणत्या गमती जमती करता येतील याचे मजेदार वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केले आहे.
| शब्द | अर्थ |
|---|---|
| सानुली | लहानशी |
| ओढ | आकर्षण |
| स्वैर | मुक्त |
| राई | बाग |
| कानोसा घेणे | चाहूल घेणे |
| अंगुली | बोट |
| पसार होणे | पळून जाणे |
| कुंज | वन |
| अलगूज | बासरी |
| हितगूज | गुजगोष्टी, मनातल्या गोष्टी सांगणे |
| राबणे | कष्ट करणे |
- १. कधी बाजारी जावे.
- २. कधी नदीच्या काठी जावे.
- ३. राईत (बागेत) जावे.
- ४. कधी पडक्या वाड्यापाठी जावे.
- १. हळू थबकत जावे.
- २. कधी कानोसा घेत जावे.
- ३. कधी रमतगमत जावे.
- ४. वा कधी थेट भरारी घ्यावी.
- १. दिशादिशांतून फुलांचा सुगंध उधळून देणे.
- २. गाण्याची गोड लकेर चौफेर पसरवणे.
- ३. दिवसभर राबून दमलेल्या लोकांच्या मुखावर टवटवी आणणे.
Advertisement
- (१) तिला स्वातंत्र्य हवे असते.
- (२) तिला सर्वत्र हिंडायचे असते.
- ✔ (३) तिचे मन तिकडे ओढ घेते.
- (४) तिला लोक आमंत्रण देतात.
- (१) झुळूक स्वतःच गाणे गाते.
- (२) तिथे गुराखी अलगूज वाजवतो.
- (३) तिथे ध्वनिफित लावलेली असते.
- ✔ (४) झुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगूजाचा आवाज निघतो.
- (अ) झुळकेने कलिकेला स्पर्श केला — कलिका फुलून बघते तोच झुळूक पार पसार होते.
- (आ) बकुळीच्या फुलांना स्पर्श केला — बकुळीची सारी फुले डोहात शिंपली जातात.
कुठूनतरी चुकून ऐकू आलेली गाण्याची एखादी गोड आणि सुंदर धून.
हिरव्यागार पाचूच्या रत्नांसारखे आणि मखमलीसारखे मऊ, हिरवेगार डोलणारे शेत.
- (अ) झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे – नदीचा काठ, राई, झरा, पाचूचे शेत, निळी नदी, वेळूचे कुंज
- (आ) कवितेतील वर्णनावरून कवीने वर्णन केलेला ऋतू – ग्रीष्म / उन्हाळा (कारण जांभळे पिकलेली आहेत)
- (इ) झुळकेचा विश्रांतीचा प्रहर – तिन्हीसांजा (संध्याकाळ)
- (१) व्हावे – झुकावे
- (२) काठी – पाठी
- (३) हळुवार – पसार
- (४) अलगूज – हितगूज
- (१) छोटी – सानुली
- (२) ताजेपणा – टवटवी
- (३) बोट – अंगुली
- (४) पावा – अलगूज
(अ) झुळुकेची परोपकारी वृत्ती :
झुळूक स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगते. ती जाता-जाता फुलांचा सुगंध दिशादिशांना उधळते. गाण्याची गोड लकेर सर्वत्र पसरवते. दिवसभर कष्ट करून दमलेल्या लोकांच्या अंगाला स्पर्श करून त्यांच्या चेहऱ्यावर ताजेपणा (टवटवी) आणते. यातून तिची परोपकारी वृत्ती दिसून येते.
(आ) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण :
मला ही कविता खूप आवडली; कारण कवीने वाऱ्याच्या छोट्याशा झुळकेचे अतिशय सुंदर आणि जिवंत वर्णन केले आहे. झुळूक कशी मुक्तपणे फिरते, निसर्गात कशी बागडते आणि लोकांना कसा आनंद देते हे वाचताना आपणही त्या झुळकेसोबत फिरत आहोत असा आनंद मिळतो.
'तुम्ही पक्षी आहात', अशी कल्पना करून तुम्हांला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील, ते लिहा.
जर मी पक्षी असतो, तर मला उंच आकाशात स्वच्छंदीपणे भराऱ्या मारायला खूप आवडले असते. मी डोंगर-दऱ्या, नद्या, जंगले यांवरून उडत निसर्गाचे सौंदर्य मनसोक्त पाहिले असते. झाडांच्या फांद्यांवर बसून गोड गाणी गायली असती. मला कोणत्याही देशाची सीमा अडवू शकली नसती; मी संपूर्ण जग फिरून पाहिले असते आणि खऱ्या स्वातंत्र्याचा आनंद लुटला असता.
नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.
नदी :नमस्कार झाडदादा, कसा आहेस तू?
झाड :मी मजेत आहे! तू कशी आहेस नदिताई? आज खूप खळखळून वाहतेयस!
नदी :हो रे! आत्ताच डोंगरावरून खाली आले. पण तू इथे एकाच जागी उभा राहून कंटाळत नाहीस का?
झाड :नाही ग! माझी पाळेमुळे या मातीत घट्ट रुतली आहेत. इथूनच मला जीवन मिळते.
नदी :खरंय तुझं. तू एका जागी थांबून इतरांना सावली देतोस, गोड फळे देतोस.
झाड :आणि तू सतत वाहून सर्वांची तहान भागवतेस, शेती हिरवीगार करतेस.
नदी :आपण दोघेही निसर्गाची लेकरे आहोत आणि इतरांसाठीच जगतो.
झाड :हो ना! चल, पुढच्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा!