इयत्ता ९ वी · मराठी · भाग १

१. सर्वात्मका शिवसुंदरा

कुसुमाग्रज — कवितेचा भावार्थ, कवी परिचय व माहिती. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (कुमारभारती).

Advertisement

पाठाचा आशय : परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची व जीवनातील संकटांशी धैर्याने सामना करण्याची शक्ती, कवी प्रस्तुत गीतातून मागत आहेत. प्रस्तुत गीत हे केवळ काव्यानंदासाठी घेतले असून, ते विद्यार्थ्यांकडून तालासुरात म्हणवून घेण्यासाठी आहे. पाठ्यपुस्तकात या गीतावर कोणताही स्वाध्याय दिलेला नाही.

★कवी परिचय — कुसुमाग्रज (विष्णु वामन शिरवाडकर)

(१९१२-१९९९) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक, कवी आणि नाटककार.

प्रसिद्ध काव्यसंग्रह 'जीवनलहरी', 'विशाखा', 'समिधा', 'स्वगत', 'हिमरेषा', 'वादळवेल', 'मारवा', 'किनारा' इत्यादी.
प्रसिद्ध नाटके 'वैजयंती', 'राजमुकुट', 'कौंतेय', 'नटसम्राट', 'वीज म्हणाली धरतीला', 'विदूषक' इत्यादी.

Advertisement