५. व्यायामाचे महत्त्व
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज — संपूर्ण स्वाध्याय, प्रश्नोत्तरे आणि भाषाभ्यास (समास). महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (कुमारभारती).
शेअर कराAdvertisement
स्वाध्याय
- (अ) व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो. — बरोबर
- (आ) व्यायामाने जडत्व वाढते. — चूक
- (इ) व्यायामाने स्नायू अशक्त होतात. — चूक
- (ई) व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते. — बरोबर
| (अ) आरोग्य देणारी | आरोग्यदायी |
| (आ) विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती | प्रतिकारशक्ती |
| (इ) स्वतःची कामे स्वतः करणारा | स्वावलंबी |
Advertisement
व्यायामाविण (व्यायाम न केल्यास) :
(अ) व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
व्यायाम हा आपला आरोग्यदायी मित्र आहे. व्यायामामुळे शरीरातील आळस दूर पळून जातो. नियमित व्यायाम केल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि शरीर निरोगी राहते. स्नायू बळकट होतात आणि शरीरात उत्साह व तरतरी संचारते.
व्यायामामुळे रक्ताभिसरण उत्तम होऊन माणसाची विचारशक्ती व आजारांना विरोध करणारी प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे माणसाला दीर्घायुष्य लाभते. अंगात स्वावलंबनाची सवय आणि कोणतेही काम करण्यासाठी स्फूर्ती निर्माण होते. थोडक्यात सांगायचे तर, सुदृढ आणि आनंदी जीवनासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे.
(आ) 'व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची ।।' या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
व्यायाम केल्यामुळे शरीरातील जडत्व आणि आळस पूर्णपणे नाहीसा होतो. शरीरात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. हा उत्साह आपल्याला कोणतेही काम करण्यासाठी प्रोत्साहन देतो.
अंगात तरतरी आल्यामुळे आपण आपले काम जलद, एकाग्रतेने आणि आनंदाने करू शकतो. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रस्तुत पंक्तीत म्हणतात की, व्यायामामुळे कोणतेही कार्य करण्यासाठी अंगात स्फूर्ती (उत्साह) निर्माण होते.
(इ) 'आरोग्यम् धनसंपदा' या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
'आरोग्यम् धनसंपदा' म्हणजे उत्तम आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे. माणसाकडे कितीही पैसा, गाडी, बंगला असला, पण जर त्याचे आरोग्य चांगले नसेल, तर त्याला या भौतिक सुखांचा आनंद घेता येत नाही. आजारी माणसाला पैशाने सुख विकत घेता येत नाही.
याउलट, एखादा गरीब माणूस जर निरोगी आणि सुदृढ असेल, तर तो कष्टाने पैसे कमवू शकतो आणि सुखी जीवन जगू शकतो. आरोग्य चांगले असेल तर मनही प्रसन्न राहते व माणूस उत्साहाने काम करू शकतो. म्हणूनच, शरीराची काळजी घेणे, नियमित व्यायाम करणे आणि निरोगी राहणे हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई किंवा संपत्ती आहे.
भाषाभ्यास — समास
समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात. त्याला 'पद' असे म्हणतात. त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे, यावरून समासाचे प्रकार ठरतात.
| पद | प्रधान / गौण (कमी महत्त्वाची) | समासाचे नाव |
|---|---|---|
| (१) पहिले पद | प्रधान (महत्त्वाचे) | अव्ययीभाव समास |
| (२) दुसरे पद | प्रधान (महत्त्वाचे) | तत्पुरुष समास |
| (३) दोन्ही पदे | प्रधान (महत्त्वाची) | द्वंद्व समास |
| (४) दोन्ही पदे | गौण (कमी महत्त्वाची) | बहुव्रीही समास |
टीप : यावर्षी इयत्ता ९ वी मध्ये आपल्याला 'अव्ययीभाव' आणि 'द्वंद्व' हे दोन समास समजून घ्यायचे आहेत.