१०. बैलपोळा (कविता)
कवी — धोंडीरामसिंह राजपूत | कवितेचा संपूर्ण स्वाध्याय व प्रश्नांची उत्तरे — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).
शेअर कराAdvertisement
| शब्द | अर्थ |
|---|---|
| न्हाऊ घालणे | अंघोळ घालणे |
| झूल | बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत व नक्षीदार कापड |
| बाशिंग | बैलांच्या डोक्याला बांधण्याचे आभूषण |
| दिन | दिवस |
स्वाध्याय
(अ) बैलांच्या सणाला काय म्हणतात ?
बैलांच्या सणाला 'बैलपोळा' किंवा 'पोळा' असे म्हणतात.
(आ) बैलांना कसे सजवले आहे?
बैलांच्या अंगावर मखमली झुली टाकून, शिंगे रंगवून आणि कपाळाला रेशमी बाशिंगे बांधून त्यांना सजवले आहे.
(इ) बैलांची नावे कोणती आहेत ?
बैलांची नावे 'ढवळ्या' आणि 'पवळ्या' अशी आहेत.
(ई) बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात ?
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात.
कवितेत आलेले शेवट समान असणारे (यमक जुळणारे) शब्द :
Advertisement
| प्राणी | निवारा (कोठे राहतात) |
|---|---|
| (अ) घोडा | तबेला / पागा |
| (आ) वाघ | गुहा |
| (इ) माकड | झाड |
| (ई) हत्ती | हत्तीखाना / पिलखाना / जंगल |
| (उ) मासा | पाणी / नदी / समुद्र |
| (ऊ) कासव | पाणी आणि जमीन |
(अ) पुरणपोळी
पुरण पोळी रण पुळी पण
(आ) गावभर
गाव भर गर वर रव
कवितेतील जोडशब्द :
- (अ) कामधाम
- (आ) पुरणपोळी
आणखी काही जोडशब्द : गोडधोड, भाजीपाला, पाऊसपाणी, केरकचरा, कामधंदा.
उदा., बाबांनी पोतंभर धान्य आणलं.
- तोंडभर — ताईने आज माझे तोंडभर कौतुक केले.
- पिशवीभर — आईने बाजारातून पिशवीभर भाज्या आणल्या.
- हातभर — शेतकऱ्याने दुकानातून हातभर दोरी आणली.
- घरभर — लहान बाळ रांगत रांगत घरभर फिरत होते.
माझा आवडता प्राणी : गाय
माझा आवडता प्राणी गाय आहे. गाय हा एक अतिशय शांत आणि उपयुक्त पाळीव प्राणी आहे. ती आपल्याला पिण्यासाठी पौष्टिक दूध देते. गाईला चार पाय, दोन शिंगे, दोन डोळे आणि एक लांब शेपटी असते. शेतकरी गाईला प्रेमाने 'गोमाता' म्हणतात आणि तिची काळजी घेतात.
खेळूया शब्दांशी — फुलांची नावे शोधा
दिलेल्या अक्षरांच्या चौकटीतून तयार होणारी १३ फुलांची नावे खालीलप्रमाणे आहेत :
टीप : ही नावे शोधताना काही नावे आडवी (उदा. पारिजातक, जाई), काही उभी (उदा. मोगरा, गुलाब, कमळ, अबोली) तर काही खालून वर अशा क्रमाने लपलेली आहेत.