इयत्ता ५ वी · मराठी
१४. चित्रसंदेश
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) इयत्ता ५ वी मराठी पाठ १४ — चित्रांवर आधारित संदेश व नियमांची माहिती.
शेअर कराAdvertisement
टीप : हा पाठ चित्रांच्या माध्यमातून सुरक्षिततेचे नियम आणि सार्वजनिक शिष्टाचार शिकवणारा आहे. खाली पाठातील चित्रसंदेशांचे स्पष्टीकरण आणि पाठातील उपक्रमांची उत्तरे दिली आहेत.
★पाठातील चित्रसंदेश (महत्त्वाचे नियम)
| चित्र / प्रसंग | संदेश / नियम |
|---|---|
| थुंकणे | बसमध्ये किंवा बसमधून बाहेर थुंकू नये. |
| कचरा टाकणे | बसमध्ये वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. |
| चालू बसमध्ये चढणे | चालत्या वाहनात किंवा बसमध्ये घाईघाईने चढू अगर उतरू नये. |
| विनातिकीट प्रवास | विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. |
| हात बाहेर काढणे | चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे व डोकावून पाहणे अत्यंत धोक्याचे आहे. |
| मनाचा ब्रेक | 'मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक' (स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे हाच सुरक्षेचा उत्तम उपाय आहे). |
Advertisement
प्र. १बसमधील सूचना व संदेशांचे वाचन करा.
बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये प्रवास करताना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक सूचना लिहिलेल्या असतात. त्या वाचून त्यानुसार वागणे हे आपले कर्तव्य आहे.
प्र. २सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा.
सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना :
- कृपया शांतता राखा (ग्रंथालय किंवा रुग्णालयात).
- पाण्याचा अपव्यय टाळा.
- आपल्या सामानाची काळजी घ्या, चोरांपासून सावध राहा (रेल्वे स्थानकावर).
- येथे कचरा टाकण्यास मनाई आहे.
- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे.
प्र. ३वर्गात भिंतीवर लिहिता येतील, अशा सूचना तयार करा.
वर्गखोलीसाठी सूचना :
- वर्ग नेहमी स्वच्छ ठेवा.
- वहीची पाने विनाकारण चुरगळू नका.
- शिक्षक आल्यावर आदराने उभे राहा.
- एकमेकांशी नेहमी मिळूनमिसळून राहा.
प्र. ४काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
काही लोकांमध्ये नियमांचे पालन करण्याची सवय नसते किंवा त्यांना सार्वजनिक शिष्टाचाराचे महत्त्व माहीत नसते. काहीजण घाईत असतात किंवा बेजबाबदारपणे वागतात. जोपर्यंत आपण स्वतः शिस्त पाळत नाही, तोपर्यंत समाज सुधारत नाही.
प्र. ५तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.
- संगणक कक्ष (Computer Lab) : शिक्षकांच्या परवानगीशिवाय संगणक सुरू करू नका. विजेच्या बटणांना ओल्या हातांनी स्पर्श करू नका.
- पिण्याच्या पाण्याचा परिसर : पाण्याचा नळ वापरल्यानंतर व्यवस्थित बंद करा. पाणी सांडवू नका.
- ग्रंथालय (Library) : पुस्तके आदराने हाताळा. ग्रंथालयात जोरात बोलू नका.
- मैदान (Playground) : खेळताना स्वतःची आणि मित्रांची काळजी घ्या.