१५. नदीचे गाणे (कविता)
कवी — वि. म. कुलकर्णी | कवितेचा संपूर्ण स्वाध्याय, एका वाक्यात उत्तरे आणि चित्र वर्णन — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).
शेअर कराAdvertisement
(अ) मंजूळ गाणे कोण गाते ?
मंजूळ गाणे नदी गाते.
(आ) गावे कोठे वसली आहेत ?
गावे नदीच्या तीरावरती (काठावर) वसली आहेत.
(इ) नदीवर शीतल छाया कोण धरते ?
नदीवर आम्रतरू (आंब्याचे झाड) शीतल छाया धरतात.
(ई) नदी जेथे जाईल तेथे काय करेल ?
नदी जेथे जाईल तेथे आनंदाची सुंदर बाग फुलवेल.
फुलवेली मज सुमने देती,
कुठे लव्हाळी खेळत बसती,
कुठे आम्रतरू माझ्यावरती,
शीतल अपुली छाया धरती.
| 'अ' गट | 'ब' गट |
|---|---|
| (१) झुळझुळ | (इ) पाणी |
| (२) मंजूळ | (अ) गाणे |
| (३) शीतल | (आ) छाया |
Advertisement
मंजूळ, शीतल, झुळझुळ, लतावृक्ष, लव्हाळी, आम्रतरु.
विद्यार्थ्यांनी वरील शब्द जसेच्या तसे बघून शुद्ध स्वरूपात वहीत लिहून काढावेत.
१. या चित्रात एक सुंदर आणि स्वच्छ नदी वाहत आहे.
२. नदीच्या पाण्यात मुले-मुली आनंदाने पोहत आहेत.
३. नदीच्या किनाऱ्यावरील घाटावर बायका पिण्याचे पाणी भरत आहेत.
४. नदीच्या पात्राजवळ गुरे शांतपणे पाणी पीत आहेत आणि आकाशात पक्षी उडत आहेत.
५. निसर्गरम्य अशा या नदीच्या तीरावर एक छोटेसे गाव व सुंदर मंदिर दिसत आहे.
लहानपणी हिरवा, चव माझी आंबट. मोठेपणी पिवळा, चव माझी गोड, मी तर आहे फळांचा राजा.
उत्तर: आंबा
लाल चोच माझी, डाळिंब मी खातो. हिरवा माझा रंग, मिठू मिठू बोलतो.
उत्तर: पोपट