४. ही पिसे कोणाची?
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती) इयत्ता ५ वी मराठी पाठ ४ — संपूर्ण स्वाध्याय व प्रश्नांची उत्तरे.
शेअर कराAdvertisement
| शब्द | अर्थ |
|---|---|
| दूर | लांब |
| निरखून पाहणे | लक्षपूर्वक पाहणे |
| मोहक | सुंदर |
स्वाध्याय
(अ) मिनूचे घर कोठे होते?
मिनूचे घर शेतात होते.
(आ) मिनू कोणाकोणाला भेटली?
मिनू कोंबडी, कबुतर, मोर आणि बदक यांना भेटली.
(इ) मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला ?
मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला.
(ई) पिसे कोणाची होती?
ती पिसे बदकाची होती.
(उ) बदकाने मिनूला काय सांगितले ?
बदकाने मिनूला सांगितले की, "एकदा पिसं गळून पडली, की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव".
पिसे सापडल्यावर मिनूला....
- ✔ (अ) पिसे कोणाची आहेत, हे माहीत करून घ्यायचे होते.
- (आ) पिसे घरी न्यायची होती.
Advertisement
| 'अ' गट | 'ब' गट |
|---|---|
| (१) बदक | (आ) नदी |
| (२) कोंबडी | (इ) खुराडे |
| (३) कबुतर | (अ) झाड |
| शब्द | उदाहरणाप्रमाणे रूप |
|---|---|
| घर | घरापासून |
| गाव | गावापासून |
| तळे | तळ्यापासून |
| घर | घराजवळ |
| पाय | पायाजवळ |
| घरटे | घरट्याजवळ |
| खुराडे | खुराड्यात |
| शाळा | शाळेत |
मला शाळेत किंवा वर्गात एखादी अनोळखी वस्तू (उदा. पेन, पेन्सिल, वही किंवा डबा) सापडली, तर मी ती वस्तू माझ्या वर्गशिक्षकांकडे जमा करतो. ती वस्तू कोणाची आहे, हे शिक्षक वर्गात विचारून त्या विद्यार्थ्याला परत करतात.
तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग यांची माहिती लिहा. (हा कृतीयुक्त उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतःच्या निरीक्षणावरून पूर्ण करावा.)