६. टप् टप् पडती
कवी — मंगेश पाडगांवकर | स्वाध्याय, भावार्थ व व्याकरण — महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (बालभारती).
शेअर कराAdvertisement
कवितेचा भावार्थ
मोकळ्या कुरणावरती असणाऱ्या प्राजक्ताच्या (पारिजातकाच्या) झाडाची पडणारी फुले आणि त्यांचे सौंदर्य अनुभवणाऱ्या मुलांच्या मनातील आनंद कवी मंगेश पाडगांवकर यांनी या कवितेतून व्यक्त केला आहे.
कवी म्हणतात की, अंगावरती प्राजक्ताची फुले 'टपटप' अशी पडत आहेत आणि त्या पडणाऱ्या फुलांच्या तालावर आम्ही 'भिरभिर' असे आनंदाचे गाणे गात आहोत. मोकळ्या कुरणावरती (गवतावरती) आणि झाडांखाली ऊन-सावलीचे सुंदर जाळे विणले गेले आहे. भरारा वाहणाऱ्या वाऱ्यासोबत गवतही आनंदाने डुलत आहे.
आमच्या गाण्याचे सूर दूरदूरपर्यंत वाहत जात आहेत आणि जणू ते पिवळ्या उन्हात आनंदाने नाहत आहेत. ही धरती हसत आहे आणि झाडांच्या फांदीवरती आमचा हा झोपाळा झुलत आहे. आमचे गाणे म्हणजे झुळझुळ वाहणारा वारा आणि आकाशातील लुकलुकणारा तारा आहे. आमच्या या गाण्यातून पाऊस, वारा आणि मोराचा पिसारा फुलून येत आहे.
चला रे मुलांनो, आपण सर्वजण फुलांसारखे एकत्र येऊन आणि सुरात सूर मिसळून गाणे गाऊया. जे नेहमी आनंदाने गाणे गातात तेच खरे शहाणे असतात आणि जे गात नाहीत ते बाकीचे सारे वेडे (खुळे) असतात.
स्वाध्याय
- (अ) कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?
जेव्हा अंगावरती प्राजक्ताची फुले टपटप पडतात, तेव्हा त्या तालावर भिरभिर असे मुलांचे गाणे जुळून येते. - (आ) गवत खुशीने का डुलते?
कुरणावरती आणि झाडांखाली ऊन-सावलीचे जाळे विणले जाते आणि भरारा वारा येतो, तेव्हा गवत खुशीने डुलते. - (इ) मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते?
मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा आणि मोरपिसारा फुलतो. - (ई) कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे?
जे मुले फुलांसारखे एकत्र येऊन सुरात सूर मिसळून गाणे गात नाहीत, अशा मुलांना कवितेत खुळे (वेडे) म्हटले आहे.
- (अ) कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले ! - (आ) हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !
- (इ) पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !
Advertisement
खेळूया शब्दांशी
नादानुकारी शब्द : भिर् भिर्, झुळझुळ, लुकलुक, भरारा.
| 'अ' गट | 'ब' गट |
|---|---|
| हसरी | धरती |
| झुळझुळ | वारा |
| लुकलुक | तारा |
| फांदी | झोपाळा |
- (१) कुरणावरती — कुरण, रण, वर, वरती, तीर, रती, वार.
- (२) झाडांखाली — झाड, खाली, खडा, डाख.
- (३) ऊनसावली — ऊन, सावली, साव, वली, नसा, लीन.
| शब्द | विरुद्धार्थी शब्द |
|---|---|
| अशुभ | शुभ |
| अपयश | यश |
| उतार | चढ |
| लहान | मोठे |
| बाहेर | आत |
| वाईट | बरे |
| तोटा | नफा |
| दुःख | आनंद |
उपक्रम व माहिती
शाळा
शाळा आहे.
ही शाळा आहे.
ही माझी शाळा आहे.
ही माझी सुंदर शाळा आहे.
ही माझी सुंदर व प्रशस्त शाळा आहे.
मला माझी सुंदर व प्रशस्त शाळा खूप आवडते.
फुलांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची रंगद्रव्ये असतात, ज्यामुळे त्यांना विविध रंग प्राप्त होतात:
- हरितद्रव्ये आणि कॅरोटिन : या रंगद्रव्यांमुळे फुलांच्या पाकळ्यांना नारिंगी, पिवळा आणि हिरवा हे रंग मिळतात.
- अँथोसायनीन (Anthocyanin) : या रंगद्रव्यामुळे फुलांना लाल, गुलाबी आणि निळा वगैरे रंग मिळतात.
ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात. तसेच, कोणत्या फुलांत कोणती रंगद्रव्ये असावीत, हे त्या फुलांतील गुणसूत्रे (Chromosomes) ठरवतात. गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो व तो बदलत नाही.