१५. माझे शिक्षक व संस्कार
शंकरराव खरात — संपूर्ण स्वाध्याय, प्रश्नोत्तरे, स्वमत आणि भाषाभ्यास (सामान्यरूप). महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ (कुमारभारती).
शेअर कराAdvertisement
स्वाध्याय
(अ) शाळेच्या 'बागा' लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
श्री. गोळीवडेकर मास्तर हे खरे शेतीतज्ज्ञ शिक्षक होते. त्यांचे शाळेच्या बागा करण्यात अर्धे लक्ष असे. लेखक आणि त्यांचे मित्र वयाने आणि हाडापिंडाने कष्टाच्या कामाला कणखर होते.
शाळेची ओढ्याकाठची बाग फुलवण्यासाठी ही मुले विहिरीचे पाणी दोन-दोन तास राहाटेने ओढून झाडांना देत असत. तसेच बागेतील जमीन कुदळीने खांदणे, वाफे करणे, बंध घालणे अशी सर्व कष्टाची कामे लेखक आणि त्यांचे मित्र करत असत. त्यांच्या याच अपार कष्टामुळे शाळेच्या बागा फुलल्या होत्या, असा अर्थ या वाक्यातून स्पष्ट होतो.
(आ) लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
लेखक आपली गावची शाळा सोडणार होते. त्यांना शिक्षणाची तीव्र ओढ होती आणि पुढील उच्च शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा होती.
औंध (जि. सातारा) येथील हायस्कूलमध्ये शिक्षणाची चांगली सोय असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी तेथे जाण्याचा विचार लेखक करत होते. यासाठी ते शाळेतील शिक्षकांचा सल्ला आणि मार्गदर्शनही घेत होते.
| शिक्षक | गुणवैशिष्ट्य |
|---|---|
| (१) श्री. नाईक | (इ) समुपदेशक आणि शिस्तप्रिय |
| (२) श्री. देशमुख | (अ) स्काउटगाईड अध्यापनतज्ज्ञ |
| (३) श्री. गोळीवडेकर | (ई) शेतीतज्ज्ञ |
| (४) श्री. कात्रे | (आ) गणित अध्यापनतज्ज्ञ |
Advertisement
(अ) परिणाम - हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
घटना : लेखकाला कुस्तीच्या फडात कुस्ती खेळण्यासाठी उभे केले असता, कुणीतरी त्यांना ओळखले आणि त्यांच्या 'जातीवरून' त्यांना कुस्ती खेळण्यापासून हटकले (रोखले).
(आ) परिणाम - लेखकाची मान खाली गेली होती.
घटना : शिमग्याच्या धुळवडीला रात्री प्रौढ साक्षरतेच्या वर्गाच्या ठिकाणी तमाशाचा फड उभा राहिला होता आणि अचानक रायगावकर मास्तर तिथे आले; त्यांना पाहून लेखकाला स्वतःची लाज वाटली.
(अ) खेळातसुद्धा जातपात मानली जात असे
उदाहरण : लेखक बाहेरगावी कुस्तीचा फड पाहायला गेले होते. तिथे एका मुलाला कोणी जोड मिळत नव्हता, तेव्हा लेखक मैदानात लढण्यासाठी गेले. पण तिथे त्यांना कुणीतरी ओळखले आणि केवळ त्यांच्या जातीमुळे त्यांना कुस्ती खेळण्यापासून हटकले व त्यांना हिरमुसले होऊन माघारी यावे लागले.
(आ) लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
उदाहरण : शाळेच्या बागेतील विहिरीचे पाणी दोन-दोन तास राहाटेने ओढून झाडांना देणे, कुदळी-टिकावाने जमीन खांदणे, वाफे करणे आणि बंध घालणे अशी कष्टाची कामे लेखक आणि त्यांचे मित्र करत असत.
हिरमुसलेल्या लेखकाची समजूत घालताना रायगावकर सरांनी व्यक्त केलेले सकारात्मक विचार :
- दरारा असणे : वचक असणे किंवा धाक असणे
- हिरमुसले होणे : खट्टू होणे किंवा निराश होणे
(१) 'विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे', या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर जीवनात कसे जगावे याचे संस्कारही करतात. विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्या चुका सुधारून त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे शिक्षकांचे मुख्य काम असते.
उदा., प्रस्तुत पाठात नाईक मास्तरांनी लेखकाला शिस्त आणि जीवनातील प्रगतीचे धडे दिले. तर रायगावकर सरांनी, लेखकाला कुस्ती खेळण्यावरून हटकले गेल्यावर, निराश न होता समाजातील वास्तव समजून घेण्याचा सकारात्मक विचार दिला. अशा प्रकारे, शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्याचे योग्य व्यक्तिमत्त्व विकसित होते, हे नक्की.
(२) शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
माझ्या मते, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते हे विश्वास, आदर आणि मोकळेपणा यावर आधारलेले असावे. शिक्षक हा विद्यार्थ्याचा मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक (Friend, Philosopher and Guide) असावा. विद्यार्थ्याने न घाबरता आपल्या शंका आणि अडचणी शिक्षकांसमोर मांडल्या पाहिजेत.
शिक्षकांनीही विद्यार्थ्याला केवळ परीक्षार्थी न बनवता त्याच्यातील चांगले गुण ओळखून त्याला प्रोत्साहन द्यावे. जेव्हा शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला समजून घेऊन प्रेमाने जवळ करतात, तेव्हा ते नाते आयुष्यभरासाठी टिकते आणि तो विद्यार्थी भविष्यात एक चांगला नागरिक बनतो.
तुमचे प्राथमिक शाळेतील शिक्षक आठवा व त्यांतील अविस्मरणीय शिक्षकांशी संबंधित असलेल्या तुमच्या आठवणी लिहा.
(हा उपक्रम विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवावरून वहीत लिहावा.)
भाषाभ्यास
| वाक्ये | मूळ शब्द | सरळरूप | सामान्यरूप | प्रत्यय |
|---|---|---|---|---|
| (१) रमेशचा भाऊ शाळेत गेला. | रमेशचा | रमेश | रमेश | चा |
| शाळेत | शाळा | शाळे | त | |
| (२) बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. | बँकेने | बँक | बँके | ने |
| शेतकऱ्याला | शेतकरी | शेतकऱ्या | ला | |
| (३) सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. | सुट्टीत | सुट्टी | सुट्टी | त |
| मित्रांशी | मित्र | मित्रां | शी | |
| (४) मंडईत फळांच्या गाड्या आहेत. | मंडईत | मंडई | मंडई | त |
| फळांच्या | फळ | फळां | च्या |